सारांश
मूळ इंग्रजी असलेले, अनेक पुरस्कारप्राप्त आणि अमेरिकेत बेस्ट सेलर असलेले लेखक समीर भिडे लिखित 'One Fine Day' हे पुस्तक आता मराठीमध्ये राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. याचा मराठीतील अनुवाद प्रसिद्ध लेखिका सुनीता लोहोकरे यांनी केला आहे.
अचानक पक्षाघाताचा झटका येणं, मेंदूवर बिकट शस्त्रक्रिया होणं, बायकोनं साथ सोडून निघून जाणं... असा संकटांचा एकाहून एक मारा चालू असताना चिवटपणे, "सकारात्मकते" नं कसं जगावं, याचा वस्तुपाठ म्हणजे "एक दिवस अचानक" हे पुस्तक..
तपशील
आरोग्यावर संकट येण्याच्या आधीचं माझं साधं आणि परिपूर्ण आयुष्य व नंतर त्यातून सावरण्यासाठी मी घेतलेल्या पारंपरिक आणि असामान्य उपचारांची काही वर्ष हा प्रवास 'एक दिवस अचानक' या पुस्तकातून मांडलेला आहे. या माझ्या प्रवासात मला लागलेले शोध, मनावर उमटलेली प्रतिबिंब आणि बरं होण्याच्या व नवं जीवन जगण्याच्या तीव्र इच्छाशक्तीतून निर्माण झालेल्या जाणीवा याची ओळख या पुस्तकातून तुम्हा वाचकांना होईल.